
नागपूर: नागपुरात झालेल्या दंगल आणि हिंसाचार प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप असणाऱ्या फहीम खान याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सोमवारनंतर तो कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फहीम खानवर जातीय तेढ निर्माण करणे, प्रक्षोभक भाषणे देत लोकांची माथी भडकवणे, तसेच सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी त्याच्या विरोधात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते.