नागपूर-शिर्डी समृध्दी महामार्ग सर्वसामाण्यांसाठी लवकरच खुला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा नागपूर - मुंबई जोडणारा समृध्दी महामार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.

नागपूर-शिर्डी समृध्दी महामार्ग सर्वसामाण्यांसाठी लवकरच खुला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा नागपूर - मुंबई जोडणारा समृध्दी महामार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच नागपूर - शिर्डी या पहिल्या टप्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबई - पुणे मीसिंग लिंक पाहणी दौऱ्यात असतांना सकाळ शी बोलतांना सांगितले. यापूर्वी दिवाळीत समृध्दी महामार्गाचे लोकार्पण केले जाणार अशी चर्चा होती मात्र, दिवाळीत लोकार्पनाचा मुहूर्त बारगळला.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाला सुरुवातीपासूनच घरघर लागली आहे. भाजपा शिवसेना युती सरकार मध्ये सुरू झालेला प्रकल्प पूर्ण करून लोकार्पण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील होते. मात्र पहिल्या टप्याचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण झाले नसल्याने आतापर्यंत लोकार्पनाचे अनेकवेळा मुहूर्त टळले, महाविकास आघाडी सरकार मध्येही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पहिल्या टप्याचे लोकार्पण होईल अशी अपेक्षा होती. मात्र, वाशीम, मालेगाव येथील गर्डर पडण्याच्या घटना घडल्या.

परिणामी पहिल्या टप्प्याचे मुहूर्त टळले आता पुन्हा सत्तांतरण होऊन तीनही सरकार मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री असणारे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहे. त्यामुळे यावेळी फडणवीस- शिंदे यांच्या सरकार मध्ये समृध्दी महामार्गाचे लोकार्पण होईल अशी अपेक्षा केली जात आहे. शिंदे यांनी लोकार्पण लवकरच केले जाणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचेही बोलल्या जाते. मात्र, डिसेंबर मध्ये दोन टप्यात गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मध्ये व्यस्त राहण्याची शक्यता असल्याने पुन्हा लोकार्पनाचा मुहूर्त टळू नये हे महत्वाचे.