मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही; भाजप आमदारानं व्यक्त केली खंत

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री असताना आरक्षण का मिळाले नाही?
Nagpur Winter Session Jaykumar Gore
Nagpur Winter Session Jaykumar Goreesakal
Updated on
Summary

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका कायम आहे.

नागपूर : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) गेल्या तीन-चार दिवसांपासून मराठा आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावरून अनेक आमदारांनी सरकारला टोले लगावले आहेत. माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी मात्र आक्रमकपणे मुद्दे मांडत आजपर्यंत मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले; पण आरक्षण मिळालं नाही, ही खंत या समाजाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री असताना आरक्षण का मिळाले नाही? असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. गोरे म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे; पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका कायम आहे.

Nagpur Winter Session Jaykumar Gore
Nitesh Rane : मुस्लिमांविरोधात नितेश राणेंचं 'ते' वक्तव्य अत्यंत भयंकर; राष्ट्रवादीच्या नेत्याकडून कारवाईची मागणी

समाज जरांगे-पाटलांवर विश्वास ठेवतो; पण आठ- आठ टर्म आमदार राहिलेल्या आमदारांवर समाजाचा विश्वास राहिलेला नाही, याला आपणच जबाबदार आहोत. समाज गावात येऊ देत नाही, याचा विचार सर्वांनी करावा.’’

Nagpur Winter Session Jaykumar Gore
विधिमंडळात पेटलं कोयनेचं पाणी! जयंत पाटील, विश्‍वजित कदम, विक्रम सावंत आक्रमक; सरकारला धरलं धारेवर

मराठा समाजाचे मुख्यमंत्री या महाराष्ट्रात होऊन गेले; पण आरक्षण मिळाले नाही, ही खंत मराठा समाजाला असून, पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री असताना आरक्षण का मिळाले नाही? असा सवालही त्यांनी सभागृहात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Political Sparks Fly as Gore Targets MP Over Delhi Road Remarks
Jaykumar Gore clarifies his stance on Praniti Shinde, calling her like a sister despite political differences.
Minister Jaykumar Gore raises concerns over overnight statue installations; CM orders detailed study.
“I Belong Here”: Jaykumar Gore Speaks on Maratha Issues and Policy Changes
Marathi News Esakal
www.esakal.com