
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार व्हायरला हवा, असं विधान करणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी यू टर्न घेतला आहे. आपण केलेलं विधान हे अपुऱ्या माहितीवर आणि अजाणतेपणी केलं होतं, असं ते म्हणाले आहेत. मारेकऱ्यांच्या क्रूरतेचे फोटो सोमवारी व्हायरल झाले होते. मंगळवारी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. यादरम्यान नामदेव शास्त्रींवर सोशल मीडियातून टीका केली जात होती. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.