तुम्हाला माहितीय आठवडा सात दिवसांचा का असतो...? जाणून घ्याच ... 

सुस्मिता वडतिले
रविवार, 12 जुलै 2020

आठवड्यात प्रत्येक दिवस दर आठ दिवसानंतर येतो, म्हणून त्याला आठवडा म्हणतात. आठवडा या शब्दात जरी आठ हा शब्द येत असला तरी त्याचा कालावधी हा आठ नाही तर सात दिवसांचा असतो. एका आठवड्यातील सात दिवसांना क्रमाने रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार अशी वारांची नावे आहेत.

प्रत्येकजण रोजच्या दैनंदिन जीवनात आप-आपल्या कामात व्यस्त असतोच. कोण नोकरदार वर्ग असतो... तर कोण घरगुती काम करणारा असतो. त्यामुळे अनेकांच्या कामाचे नियोजन ठरलेले असतेच. आपण आज काय करत आहोत आणि पुढील आठवड्यात काय काम करणार आहोत. ते ठरवतो. तसेच प्रत्येक वार दर आठव्या दिवशी परत येतो. त्यामुळे या चक्राला 'आठवडा' असे म्हणतात. आठवड्याच्या सात दिवसांची व्यवस्था आहे तशी का आहे याचा विचार करायला कोणी कधी थांबतो का? रविवारनंतर सोमवार, त्यानंतर मंगळवार आदी सात दिवसांच्या परंपरेने आपल्या विचारांचा इतका अविभाज्य भाग झाला आहे की. आठवडा सात दिवसांचा का असतो... ते तसे का आहे... हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे, हेही आपल्याला सुचत नाही. आठवड्यात दिवस सातच का, रविवारनंतर सोमवार यावा, सोमवारनंतर मंगळवार यावा ही व्यवस्था कोणी, कोठे निर्माण केली असे प्रश्न विचार केल्यास निर्माण होतात. मराठी शब्कोशमध्ये याच्या नोंदी आहेत. चला तर मग आठवडा सात दिवसांचा का असतो ते जाणून घेऊयात...    

आठवड्यात प्रत्येक दिवस दर आठ दिवसानंतर येतो, म्हणून त्याला आठवडा म्हणतात. आठवडा या शब्दात जरी आठ हा शब्द येत असला तरी त्याचा कालावधी हा आठ नाही तर सात दिवसांचा असतो. एका आठवड्यातील सात दिवसांना क्रमाने रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार अशी वारांची नावे आहेत. लागोपाठ सात दिवसांचा मिळून होणारा कालावधी याला ‘आठवडा’ किंवा ‘सप्ताह’ असे म्हणले जाते. यात सात वार असतात. आधुनिक काळात जगातील बहुतेक सर्व देशांत सात दिवसांचा आठवडा रूढ असून वारांच्या नावांचा क्रमही रविवार ते शनिवार असाच आहे.

असा स्वीकारला सात दिवसांचा आठवडा... 

सूर्यचंद्रांशिवाय नुसत्या डोळ्यांनी दिसणारे ग्रह म्हणजे मंगल, बुध, गुरू, शुक्र आणि शनी हे आहेत. यावरून वारांना या सात खस्थ ज्योतींची नावे पश्‍चिम आशियातील खाल्डियन लोकांनी प्रथम प्रसृत केली. खाल्डियन लोकांत फलज्योतिषाचा पुष्कळ फैलाव झाला होता. या सात ग्रहांना फलज्योतिषात महत्त्वाचे स्थान दिल्यामुळे खाल्डियनांनी सात दिवसांचा आठवडा स्वीकारला व तोच हळूहळू सर्वत्र रूढ झाला.

म्हणून आठवडा हा शब्द झाला रूढ... 

सात-सात दिवसांचा एकेक संच ही एक गणितीय दृष्ट्या सुटसुटीत व्यवस्था आहे. त्यामुळे वर्षाचे ३६५ दिवस म्हणजे ५२ आठवडे आणि एक दिवस असे सोपे गणित होते. आठवड्यातील ‘आठ’ या शब्दाचा अर्थ न घेता ‘आठव’ या शब्दास प्रधान स्थान आहे, त्यावरूनच ‘आठवडा’ हा शब्द झाला.

वारांची ही नावे ग्रहांवरून घेतली..

वारांची ही नावे त्याकाळी माहीत असलेल्या आकाशस्थ 'ग्रहांवरून घेतली आहेत. माणसाचे भविष्य सांगण्यासाठी त्याच्या जन्मवेळी आकाशातील ग्रहांच्या स्थितींवरून जी जन्मकुंडली बनवतात, तिच्यातच हेच सात ग्रह आणि राहू-केतू असतात. म्हणून वारांची ही नावे ग्रहांवरून घेतली.

या लोकांनीही हि स्वीकारली...  

ग्रीक व रोमन साम्राज्यांत खाल्डियन लोक फलभविष्य सांगत होते. त्याच्या अनुरोधाने तिकडे वार प्रचलित झाले. खाल्डियन संस्कृतीचे केंद्र बगदाद असल्यामुळे नंतर अरबी लोकांनीही हीच पद्धती स्वीकारली. सात दिवसांचा आठवडा हे कालावधीचे एकक म्हणून स्वीकारण्यात चिनी, हिंदू, ईजिप्शीय ज्यू व पर्शियन लोकांनी पुढाकार घेतला. त्या मानाने ग्रीक आणि रोमन लोकांनी पुष्कळ उशिरा हे एकक उचलले. त्यानंतर सर्वत्र आठवडा रूढ झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The names of the seven weeks of the week are taken from the planets