'काँग्रेसला बदनाम करण्यासाठी मित्रपक्षांनी सुपारी घेतलीय?' नाना पटोलेंनी दिले स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole

'काँग्रेसला बदनाम करण्यासाठी मित्रपक्षांनी सुपारी घेतलीय?' पटोलेंनी दिले स्पष्टीकरण

नागपूर : काँग्रेसला (Congress) बदनाम करण्यासाठी आमच्याच मित्रपक्षांनी सुपारी घेतल्याचे वक्तव्य नाना पटोलेंनी (Nana Patole) केल्याचे बोलले जात होते. त्यावरच आता पटोलेंनी स्पष्टीकरण दिले असून सुपारी हा शब्द वापरला नसल्याचे म्हटले आहे. 'मी मित्रापासून सावध राहा असं म्हटलं होतं. विदर्भात राष्ट्रवादीला फारसे महत्व नाही, हे विदर्भातील जनतेने वारंवर सांगितले आहे', असं पटोले म्हणाले.

हेही वाचा: पुणे पालिकेत भाजपकडून बिल्डरांच्या हिताचे निर्णय; नाना पटोले यांचे आरोप

पटोलेंच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये आणखी नवा वाद निर्माण होईल का? अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आता स्वतः पटोलेंनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्यांनी अमरावती हिंसाचाराच्या घटनेवर देखील भाष्य केले आहे. जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेश बिहारमध्ये निवडणुका येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्र राज्य बदनाम करण्याचं यांना सुचतं. इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. त्रिपुरा राज्यात घडलेली घटना पडसाद महाराष्ट्रात पडत आहे. हा भाजपचा जुना प्रयत्न आहे. मात्र, आता हिंदू आणि मुस्लिम भाजपच्या या जाळ्यात येणार नाही, असंही पटोले म्हणाले.

भाजपचे महाराष्ट्रातून पहाटेचे सरकार गेले. त्यामुळे ते रात्री स्वप्न न बघता दिवसा स्वप्न बघतात. त्यामुळे महाराष्ट्रात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग त्यांना पटत नाही. त्यामुळे ते सरकार अस्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न करतात. हिंदू-मुस्लीम वादाचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील तर राज्यातील जनता त्याला भीक घालणार नाही, असंही पटोले म्हणाले. महाराष्ट्रात शांतता ठेवा. ज्या अफवा पसरवल्या जातात त्याला बळी पडू नये. भाजपच्या गळाला कोणी लागू नये, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.

आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन सुरू केलेल आहे देशामध्ये भुकमरी आहे ,शेतकरी आत्महत्या वाढल्या आहे देशाचा संविधान धोक्यात आला आहे या सगळ्या भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे..

loading image
go to top