जमीन व्यवहारांप्रकरणी नाना पटोले यांचे वकील उकेंना ईडीकडून अटक

ED
EDSakal
Updated on

जमीन व्यवहारांप्रकरणी ईडीकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उकेंवर पहाटेपासून कारवाई सुरू आहे. ईडीचं पथक सकाळीच नागपुरात पोहोचलं आणि धडक कारवाईला सुरुवात झाली. उके यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. एका जमीनीच्या प्रकणात ही कारवाई झाली. दरम्यान त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली असून त्यांना मुंबईला नेले जाईल अशी माहिती मिळत आहे.

राज्यभरातील सत्ताधारी पक्षातील नेते, त्यांचे कुटुंबीय आणि नीकटवर्तीय अशा अनेकांवर आजपर्यंत ईडीचे छापे पडले आहेत. त्यातच आज सकाळी अचानक नागपुरात ईडीने कारवाई केली. अॅडव्होकेट सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर आज सकाळी सक्तवसुली संचलनालयाने कारवाई केली. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. ही करवाई राजकीय हेतूने केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुढे नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्यास आश्चर्य वाटणार नाही असे म्हटले आहे. उकें यांच्या कुटुंबियांकडून या कारवाईबद्दल देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरण्यात आलंय.

ED
बैलगाडा शर्यत आयोजकांवरील गुन्हे अखेर मागे; मंत्रिमंडळचा मोठा निर्णय

दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून ईडीचं धाडसत्र सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारचे अनेक नेते आणि त्यांचे नीकटवर्तीय केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com