

Nandurbar
esakal
नंदुरबार: चिमुकलीच्या रूपात घरात लक्ष्मीचे आगमन झाल्याने पावरा कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, क्रूर नियतीने हा आनंद काही तासांतच हिरावून घेतला. चिमुकलीच्या जन्माचा आनंद साजरा होत असतानाच, त्याच दिवशी तिच्या दोन वर्षीय सख्ख्या भावाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या घटनेमुळे आईच्या एका डोळ्यात मुलीच्या जन्माचा आनंद, तर दुसऱ्या डोळ्यात पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचे दुःख. धडगाव तालुक्यातील आमला गावात नुकत्याचा घडलेल्या या घटनेने जिल्हा हळहळला.