राणेंना इंग्रजीतून प्रश्न, आधी दचकले नंतर उचकले! | Narayan Rane | BJP News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane BJP Press Conference English Question

Narayan Rane : राणेंना इंग्रजीतून प्रश्न, आधी दचकले नंतर उचकले!

Narayan Rane BJP Press Conference English Question : भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे त्यांच्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे नेते आहेत. आपली बाजू मांडताना राणे ठामपणे त्यांची भूमिका मांडतात.

तसेच त्यावेळी त्यांना कुणी हटकले किंवा काही विचारणा केल्यास राणे त्या व्यक्तीला भरसभेत सुनावण्यास मागे पुढे पाहत नाही हे अनेकदा दिसून आले आहे. याचा फटका भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना देखील एकदा बसला होता.

सध्या सोशल मीडियावर नारायण राणे यांच्या एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. त्यामध्ये त्यांना एका महिला पत्रकारानं इंग्रजीत प्रश्न विचारला आहे.

त्यावर राणे यांनी उत्तरही दिले. मात्र त्यांना त्या पत्रकारांना इंग्रजीत प्रश्न विचारणं हे आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. सोशल मीडियावरील व्हायरल त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच दाद दिली आहे.

Also Read -Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !

राणे यांची पत्रकार परिषद ही नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असते. राणे हे त्यांच्या आक्रमकपणाबद्दल ओळखले जातात. काही नेटकऱ्यांनी राणे यांच्या प्रत्युत्तराची स्तूती केली आहे तर काहींनी राणे यांच्यावर टीकाही केली आहे. इंग्रजीत प्रश्न विचारल्यानं झालं काय, आपण त्यावर उत्तर देणं गरजेचं आहे.

कुणी जाणीवपूर्वक तर या गोष्टी करत नाही ना अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन राणे यांना नेटकऱ्यांनी दिल्या आहे. दुसरीकडे राणे यांनी तो प्रश्न ऐकल्यावर दिलेली प्रतिक्रिया तितकीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

राणे इंग्रजीतील तो प्रश्न ऐकल्यावर म्हणाले की, येस, येस, यावेळी त्यांनी पुन्हा त्या प्रश्नाशी संबंधित आपल्या उत्तरात इंग्रजीतून आकडेवारीचा उल्लेख केला. मग तो पूर्ण प्रश्न ऐकल्यावर ते म्हणाले की, तुम्ही मला मराठीतून प्रश्न का विचारत नाही.

तुम्हाला मराठी येते ना, आणि मी आपल्याला ओळखतो. अशा शब्दांत राणे यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याव्हिडिओनं मात्र नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.