''आजारी मुख्यमंत्री-आजारी सरकार'', नारायण राणेंची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray-Narayan-Rane

''आजारी मुख्यमंत्री-आजारी सरकार'', नारायण राणेंची टीका

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

सिंधुदुर्ग : राज्य सरकारने अद्यापही अधिवेशनाची (maharashtra winter assembly session 2021) तारीख ठरवली नाही. आता अधिवेशन जानेवारी महिन्यात होईल असं बोललं जातंय. यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Union Minister Narayan Rane) महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) टीका केली. ''राज्य सरकार अधिवेशन घ्यायच्या मानसिकतेमध्ये नाही. आजारी सरकार आणि आजारी मुख्यमंत्री आहेत'', असं नारायण राणे म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा?

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राणे भडकले होते. त्याबाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले, ''जिल्ह्याच्या विकासाचा निधी दिवसेंदिवस कमी होत आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात फक्त ९ टक्के खर्च झाला आहे. यावरून या सरकारची ग्रामीण विकासाची भूमिका काय आहे? हे स्पष्ट होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला योग्य वागणूक दिली जात नाही. येथील कुठल्याही गोष्टीची दखल देखील घेतली जात नाही. वादळं आणि नैसर्गिक आपत्ती आली. पण, सरकारने भरपाई दिली नाही.''

जानेवारीनंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्याकडे कुठलेही नियोजन नाही. आधी पैसे द्यायचे आणि मग परत घ्यायचे, अशी टीकाही राणेंनी केली.

''खासदार दलाली करत फिरतात'' -

मेडीकल कॉलेजच्या कामामध्ये नारायण राणे खोडा घालतात, असं बोललं जात होतं. त्याबाबत राणेंना विचारले असता ते म्हणाले, ''मला खोडा घालायची गरज नाही. मला सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य या विकासाच्या बाबतीत कधीही खोड्या घालायच्या नाहीत. मेडीकल कॉलेजसाठी गरज असलेल्या गोष्टी उपलब्ध करा आणि मग बोला''. जिल्ह्याच्या खासदाराला काही समजत नाही. सर्वत्र दलाली करत फिरत आहे, असा टोलाही त्यांनी खासदार विनायक राऊतांना लगावला आहे.

loading image
go to top