esakal | Chipi Airport : अखेर नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंसमोर प्रहार!
sakal

बोलून बातमी शोधा

rane

अखेर राणेंचा उद्धव ठाकरेंसमोर प्रहार! पहिल्यांदाच आमनेसामने

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गाचं उद्घाटन करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार… अशी राणेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी शिवसेनेत (shivsena) एकत्र असणारे हे दोन नेते सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे (narayan rane) यांचं उद्धव ठाकरे (uddhav thacekray) यांच्याबाबतचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर त्यांचं अटकसत्र या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आणि त्यांचं एका मंचावर येणं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं असून ते दोघेही काय बोलतात याकडेही जनतेचं लक्ष लागून राहिलेलं होतं. अखेर राणेंनी मंचावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर प्रहार केलाच.. यावेळी त्यांनी मंचावरील आदित्य ठाकरेंसह सर्वच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि रिपाइंच्या नेत्यांची नावे घेतली

मी नाव घेतलं तर राजकारण होईल

उद्ववजी विनंती आहे. याच जागेवर मी भूमिपूजन करायला आलो. त्यावेळी आंदोलन होत होतं. भूमिपसंपादन करून देणार नाही. आम्हाला विमानतळ नको. आपल्या त्यावेळच्या राजवटीत मी मंजूर केलं. किती विरोध किती विरोध… मी नाव घेतलं तर राजकारण होईल.

कोण अडवत होतं. विचारा जरा

अजित पवारांनी नाव घेतलं. हा हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आमचं काय भागवा आणि रस्ता सुरू करा. कोण अडवत होतं. विचारा जरा.

अजित पवारांनी 100 कोटी दिले

सीवर्डसाठी अजित पवारांनी 100 कोटी दिले. काय झालं हो. कोणी सीवर्ड कॅन्सल केलं. भांडं काय फोडायचं किती फोडायचं. तुम्ही समजतात तसं नाहीये. म्हणून परिस्थिती बदलतेय, असंही त्यांनी सांगितलं.

...पण ती माहिती चुकीची

स्टेजवर आल्यावर कळलंच नाही कार्यक्रम कुणाचा? काय प्रोटोकल काय? मानसन्मान घ्या. प्रोटोकॉल जरुर पाळा. तुम्हाला सर्व माहिती मिळते, ब्रीफ होतेय. पण ती माहिती चुकीची आहे. तुम्ही माहिती घ्या. गुप्तपणे माहिती घ्या. तुमचे लोक काय करतात.

चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू

बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांना थारा नव्हता. वाईट बुद्धीने बोलायचं. यायचं हे चांगलं नाही. चांगल्या मनाने या. आम्ही तुमचं स्वागत करू, असं ते म्हणाले.

90 साली बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं

पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांनी यावं. पाच सहा लाख खर्च करावेत, त्यामुळे सिंधुदुर्गाच्या वासियांना रोजगार मिळावा. या हेतूने हे विमानतळ व्हावं हा हेतू होता. 90 साली बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. तुझी सिंधुदुर्गाला गरज आहे म्हणाले. मी आलो आणि निवडून आलो. त्यापूर्वी मी कणकवलीच्या चारपाच गावांपर्यंत मर्यादित होतो. मी या जिल्ह्यात फिरलो. तिथे प्यायला पाणी नव्हते, रस्ते नव्हते. गावाचे रस्ते सोडा, हायवेही बरोबर नव्हते. शाळा असले तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही ही अवस्था होती. अनेक गावात वीजही नव्हती.

अडीअडचणीला मी धाऊन गेलो

इथली मुलं शिकली. मुंबई-पुण्यात नोकरीला यायचे. मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला हा जिल्हा होता. मी या जिल्ह्याचा विकास केला. मी सांगतो. पण हे लोकच ठरवतील. अडीअडचणीला मी धाऊन गेलो. उद्धवजी, मी बाळासाहेबांच्या प्रेरणेने हे काम केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

loading image
go to top