उद्धव ठाकरेंनी दिली होती 'मातोश्री' सोडण्याची धमकी; राणेंचा गौप्यस्फोट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नितीन गडकरी यांनी या वेळी नारायण राणे म्हणजे खरोखरच झंझावात असल्याचे गौरवोद्‌गार व्यक्‍त केले. ते म्हणाले, युती सरकारमध्ये आम्ही बरोबर काम केले. गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे माझे नेते होते असेही ते म्हणाले. 

मुंबई : "ते' पक्षात राहणार असतील, तर मी "मातोश्री' सोडतो, अशी धमकी उद्‌धव ठाकरे यांनी दिली होती, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केला. "झंझावात' या त्यांच्या आत्मचरित्र प्रकाशन समारंभात ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

यशवंतराव चव्हाण सभागृहात मुंबईत झालेल्या कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते. शिवसेना आता पूर्वीची राहिली नाही, मी बाळासाहेबांवर कायम प्रेम केले अन त्यांनीही मला खूप दिले असे ते म्हणाले. आगामी राजकीय वाटचालीबाबत मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया किंवा संकेत या कार्यक्रमात दिले नाहीत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. सामान्यांचे प्रश्‍न सोडवणे हेच राजकारणाचे सूत्र हवे, असेही ते म्हणाले. या वेळी बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर नक्‍की कोणत्या पक्षात जायचे हे ठरवण्यासाठी चिठ्ठी टाकली होती अशी गंमतीची आठवण सांगितली. 

नितीन गडकरी यांनी या वेळी नारायण राणे म्हणजे खरोखरच झंझावात असल्याचे गौरवोद्‌गार व्यक्‍त केले. ते म्हणाले, युती सरकारमध्ये आम्ही बरोबर काम केले. गोपीनाथ मुंडे आणि नारायण राणे माझे नेते होते असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narayan Rane speak in his Book Pulication Program mumbai