राणेंचा 'स्वाभिमान' भाजपमध्ये विलीन; युतीचे काय होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीनीकरणासह नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती जिल्ह्यात लोकसभेला मोठ्या पराभवाला स्वाभिमान पक्षाला सामोरे जावे लागले असले, तरी जिल्ह्यात राणेंची ताकद निर्णायक आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण अजूनही त्यांच्याभोवताली फिरत असल्याचे चित्र आहे.

मुंबई : स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांचा अखेर आज (सोमवार) भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोध असूनही भाजपने त्यांना सामावून घेतल्याने युतीचे होणार काय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतची चर्चा गेले दीड-दोन महिने सुरू आहे; मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाचा गुंता कायम होता. अखेर आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राणेंचा प्रवेश निश्चित झाला आहे. तसेच त्यांचे पुत्र नितेश राणे यांची कणकवलीतून उमेदवारीही निश्चित झाली आहे. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीनीकरणासह नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती जिल्ह्यात लोकसभेला मोठ्या पराभवाला स्वाभिमान पक्षाला सामोरे जावे लागले असले, तरी जिल्ह्यात राणेंची ताकद निर्णायक आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण अजूनही त्यांच्याभोवताली फिरत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जिल्ह्यातील राजकारणदेखील अस्थिर बनले आहे. राणेंचा भाजप प्रवेश झाला, तर जिल्ह्यातील राजकीय गणिते पुन्हा बदलणार आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या अनेकांचे राणेंच्या पुढील निर्णयाकडे लक्ष लागले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane todays entered in BJP at at presence CM Devendra Fadnavis