Narayan Rane: चारआण्यावरील नारायण राणेंचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane

Narayan Rane: चारआण्यावरील नारायण राणेंचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर राडा

सिंधुदूर्ग - मागील काही दिवसांपासून चलनी नोटांवर महापुरुषांचे फोटो लावण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले असून आपआपल्या पद्धतीने आपल्या नेत्यांचे फोटो नोटांवर छापण्यासाठी आग्रह करत आहेत. त्यातच आता केंद्रीयमंत्री आणि भाजपनेते नारायण राणे यांचा फोटो मॉर्फ करून कुणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पंचनाम्यांचं आश्वासन दिलं, पण...; अजित पवारांनी सांगितली वस्तुस्थिती

दोन दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महारांजांचा फोटो नोटांवर लावण्याची मागणी केली होती. नितेश यांची ही वैयक्तीक मागणी होती. मात्र त्यानंतर चारआण्याच्या नाण्यावर मंत्री नारायण राणे यांचा फोटो मॉर्फ करून लावण्यात आला. तसेच फोटो व्हायरल करण्यात आला.

दरम्यान भाजपच्या युवामोर्चाकडून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच पोस्ट व्हायरल करणाऱ्यांचे नावं देखील पोलिसांकडे देण्यात आले आहे. आता या संदर्भात तपास सुरू आहे.

हेही वाचा: Nitin Gadkari: "नागपूरला या..." नितीन गडकरींचे टाटांना थेट पत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनावर देवी-देवतांचे फोटो लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर सर्वच नेत्यांनी आपआपल्या पद्धतीने मागण्या केल्या. भाजपकडून राम कदम यांनी नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्याची मागणी केली होती.