भाजपमध्ये विलीन होणार राणेंचा 'स्वाभिमान'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

राणे त्यांच्या स्वाभिमानी पक्षासह भाजपात विलीन होणार असल्याचे सांगण्यात येते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली होती.

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कुंपणावर न राहता भारतीय जनता पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

राणे त्यांच्या स्वाभिमानी पक्षासह भाजपात विलीन होणार असल्याचे सांगण्यात येते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली होती. मात्र, शिवसेना राणेंच्या प्रवेशाला अडून आक्षेप घेण्याची शक्‍यता वर्तविली जाते.

“10 दिवसांमध्ये मी भाजपासंबंधी निर्णय घेणार आहे. येत्या 10 दिवसांनतर मी भाजपात असेन किंवा माझा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चालवायचा यासंबंधी निर्णय घेणार आहे,” असे राणे म्हणाले होते.

पक्षप्रवेशाची चर्चा खरी आहे काय, हे विचारण्यासाठी राणे यांना वारंवार संपर्क केला असता. ते उपलब्ध झाले नाहीत. अमित शहा यांच्या उपस्थितीत बडे नेते भाजपात प्रवेशणार आहेत. त्यानंतर 6 किंवा 8 सप्टेंबर रोजीही आणखी काही बडे नेते भाजपमध्ये येणार असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Ranes Swabhiman Party will merge in BJP