esakal | पुणे-नाशिकचा प्रवास होणार सुसाट; नारायणगाव बायपासचं काम पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-नाशिकचा प्रवास होणार सुसाट; नारायणगाव बायपासचं काम पूर्ण

पुणे-नाशिकचा प्रवास होणार सुसाट; नारायणगाव बायपासचं काम पूर्ण

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव बायपासचे काम पूर्ण झालं आहे. केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत नारायणगाव बायपासचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. त्याचे फोटोही त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहेत. आता कृषी उत्पादने मुंबई-पुणे मार्केटमध्ये सहज पोहोचतील, असंही नितीन गडकरी ट्विट करत म्हणालेत. नारायणगाव बायपासचे काम पूर्ण झाल्यामुळे पुणे-नाशिक-पुणे प्रवास सुसाट होणार आहे.

मागील पाच वर्षांपासून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव येथी बायपासचे काम सुरु होते. पाच किलोमीटर लांब आणि ६० मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम 2018 मध्ये भूसंपादनाच्या कारणास्तव रखडले होते. त्यानंतर आता या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळेच पुणे-नाशिक प्रवास सुसाट होणार आहे. वाहतूक कोंडीतून आता नागरिकांची सुटका होणार आहे.

loading image