
Anil Parab
Sakal
मुंबई : ‘‘रामदास कदम यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर १४-१५ वर्षांनंतर कंठ फुटला आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरेंकडून मिळत होते तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. रामदास कदम म्हणतात त्याप्रमाणे त्यांची ‘नार्को’ चाचणी झालीच पाहिजे. त्यांनी केलेल्या आरोपांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. या दाव्यातून जी रक्कम येईल ती पूरग्रस्तांना पाठवण्यात येईल, अशा शब्दांत शिवसेना नेते सचिव अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या आरोपांना शनिवारी प्रत्युत्तर दिले.