'हमे नया कश्मीर बनाना है' मोदींचा नवा नारा; पुन्हा आणूया आपले सरकार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 September 2019

शरद पवार तुम्ही असे बोलल्याचे दुःख वाटते
शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता शेजारच्या देशाबद्दल बोलल्यास दुःख वाटते. शेजारच्या देशातील लोक त्यांना चांगले वाटतात. दहशतवाद्यांची फॅक्टरी कोठे आहे, हे सर्वांना माहिती आहे. 

नाशिक : जम्मू-काश्मीरबाबत आम्ही आश्वासन दिले होते आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. काश्मीर हमारा है असे आपण म्हणत होते, आता आपण कश्मीर हमे फिरसे बनाना आहे, कश्मीर के नागरिक को गले लगाना है, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चला पुन्हा आणूया आपले सरकार, असे म्हणत मोदींनी फडणवीस सरकारच्या कामाचे कौतुक केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप नाशिकमध्ये झाला. या यात्रेच्या समारोपाला मोदी उपस्थित होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले, गिरीश महाजन, विनोद तावडे, रावसाहेब दानवे आदी भाजप नेते उपस्थित होते.

नाशिकच्या पावन आणि धर्मभूमीला माझे नमन असे म्हणत मराठीतून मोदींनी भाषणाची सुरवात केली. मोदी म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी स्वतः माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवले आहे. हा माझा सन्मान असून, त्यांच्याप्रती माझी जबाबदारी आहे. आपल्याकडे यात्रेचे कायम परंपरा राहिली आहे. देवेंद्र यांच्या यात्रेला मी नमन करण्यासाठी आलो आहे. यात्रेत कोटी नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात स्थिर सरकार चालवून राज्याला एक दिशा दिली आहे. आता महाराष्ट्राची जबाबदारी आहे, की त्यांनी आता त्यांच्या स्थिर राजकारणाचा फायदा घेतला पाहिजे. गुजरात हा तुमचा छोटा भाऊ आहे. गुजरातमध्ये सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मला दिली. काम करणाऱ्यांना जनता आशीर्वाद देते. गेल्या पाच वर्षांत फडणवीस यांनी केलेल्या कामाचे रिपोर्टकार्ड त्यांनी तुमच्यासमोर ठेवले आहे. गेल्या पाच वर्षांत मानसन्मान मिळाला. तसेच गुंतवणूकदारांना चांगली वागणूक मिळाली आणि गुंतवणूक वाढली. फडणवीस सरकारमुळे कायदा-सुव्यवस्था सुस्थितीत आहे.''  

आपल्या देशात 60 वर्षांनंतर सरकार पूर्ण ताकदिनीशी निवडून येते. पूर्ण ताकद मिळाल्यानंतर सरकार कसे काम करते हे आपण पाहत आहात. देशाच्या विकासाची गती जोरदार आहे. मी तेव्हा पण म्हटले होते, की विकासाचा हिशोब देण्यासाठी मी कायम तुमच्यात येत राहील. नव्या भारताचा दृष्टीकोन आपल्याला आता दिसत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. आमच्या सरकारच्या काळात रोजगाराच्या संधी वाढल्या. आपले संरक्षण क्षेत्र मजबूत होत आहे. भारतीय जवानांना आम्ही बुलेटप्रुफ मिळवून दिली. तर, भारत जगातील सर्वोत्तम बुलेटप्रुफ तयार करणारा आणि निर्यात करणारा देश बनला आहे. आमच्यासाठी देशापेक्षा मोठे काहीच नाही. दिल्लीतील चुकीच्या निर्णयाचे ते आतापर्यंत शिकार ठरले आहेत. विकासाचे नवे युग सुरु करण्यासाठी आपण प्रतिबद्ध आहोत. विरोधीपक्ष यातही राजकीय स्वार्थ शोधत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून या निर्णयाचे स्वागत नाही करण्यात आले, असे मोदी म्हणाले.

शरद पवार तुम्ही असे बोलल्याचे दुःख वाटते
शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता शेजारच्या देशाबद्दल बोलल्यास दुःख वाटते. शेजारच्या देशातील लोक त्यांना चांगले वाटतात. दहशतवाद्यांची फॅक्टरी कोठे आहे, हे सर्वांना माहिती आहे. 

मोदी म्हणाले - 
- 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच एक सरकार दुसऱ्यांदा निवडून दिले
- 100 दिवसांत निर्णय, लोकांनी ताकद दिल्यास काय होते ते पहिले (कलम 370), लोकांची ताकद ज्ञानाची
-  5 वर्षात सामाजिक सदभाव मिळाला, आधुनिकता, गुंतवणूक,शेतकऱ्यांना सन्मान मिळाला, महिलांना स्वयंरोजगाराची संधी, महाराष्ट्राच्या उत्थानाची कहाणी, 
- सत्तेचा हिशोब देण्याचे आश्वासन पुर्ण केले
- साफ सूत्री चित्र आहे, विकासाचा जोश, वैश्विक ताकदीचा जोश, अर्थतंत्र सुधारण्याचा प्रयत्न आहे, वचन पाळले, पंतप्रधान किसन सन्मान योजनेचे आश्वासन पूर्ण, छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन, गावागावात वीज, शौचालय दिले
- आता घराघरात पाणी पोहोचवणार
- पशुधनाला वाचविण्यासाठी लस देणार
- विरोधी पक्षांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi talked about Kashmir in Nashik for Maharashtra Vidhan Sabha 2019