
Sunita Dhangar: नाशिकमधून मोठी बातमी! लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर निलंबित
नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. (Nashik Education Officer Sunita Dhanagar Suspended )
बडतर्फ मुख्याध्यापकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांना सहकारी लिपिक नितीन जोशी यालाही लाच घेताना पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती.(Latest Marathi News)
धनगर यांच्या निलंबनाचे आदेश शासनाच्या उपसचिवांनी जारी केले आहेत. लाचखोर उपनिबंधक सतिश खरे, सुनीता धनगर हे सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्या जामीन अर्जावर आज (ता. ९) सुनावणी होणार आहे. धनगर या गेल्या बुधवारपर्यंत (ता. ७) पोलीस कोठडीत होत्या.(Latest Marathi News)
धनगर यांना पन्नास हजार तर जोशी याला पाच हजार रुपयांची लाच घेताना एसीबी नुकतेच पकडले होते. महापालिका मुख्यालयात सहा वाजेनंतर काम करता येत नाही, असे असताना धनगर या संध्याकाळी सहा वाजेनंतर संबंधितांना बोलावून घ्यायच्या असे तपासात उघड झाले आहे.(Latest Marathi News)
लाच स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांचा आधार घेतला जायचा. या काळात रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. मी कामासाठी भरपूर वेळ देते, अशा गमजा धनगर मारायच्या. जोशी याला घरातूनचं पाच हजार रुपये आणण्याची ताकीद असल्याचे शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.