Nashik : नाशिक मध्ये लागलेल्या बॅनरमागे उद्धव ठाकरेंचा हात तर नाही ना? आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

नाशिकमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात गुलशनाबाद नावाचे फलक झळकल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले
nashik gulshanabad mentioned instead of nashik on eid greetings banner
nashik gulshanabad mentioned instead of nashik on eid greetings banner

नाशिकमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात गुलशनाबाद नावाचे फलक झळकल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अशातच या फलकावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांना या पोस्टरमागे ठाकरेंचा हात असल्याचा दावा केला आहे. (nashik gulshanabad mentioned instead of nashik on eid greetings banner )

मुघलकाळात नाशिकचं नाव गुलशनाबाद असं होतं. मात्र पेशवाईच्या काळात गुलशनाबादचं नामकरण नाशिक असं करण्यात आलं. या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अशातच, आशिष शेलार यांनी यावर भाष्य केलं.(Latest Marathi News)

nashik gulshanabad mentioned instead of nashik on eid greetings banner
Rahul Kanal : राहुल कनल यांचा ठाकरेंना जाहीर 'जय महाराष्ट्र!' म्हणाले, आता अहंकार सर्वांना दिसेल

काय म्हणाले शेलार?

बघावं लागेल या माहे उद्धवजींचा हात नाही ना? जो काही घटनाक्रम दिसतोय त्यामुळे जे काही बँनर लागले त्या मागे उद्धवजींचा पक्ष नाही ना याची चॊकशी व्हयाला पाहिजे. अशी मागणी शेलार यांनी केली आहे. तसेच, आज सुप्रियाजींवर मी काही टीका करणार नाही त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. असही शेलार यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

nashik gulshanabad mentioned instead of nashik on eid greetings banner
PM Modi in Delhi Metro : दिल्लीकरांना मिळालं मोठं सरप्राईज! PM मोदींनी केला मेट्रोमधून प्रवास, प्रवाशांशी मारल्या गप्पा

काल सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परंतु नाशिकमध्ये बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर नाशिक ऐवजी गुलशनाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, हे पोस्टर रात्रीत उतरवण्यात आलं. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com