HSC Exam 2024 : बारावीचा आजपासून परीक्षारंभ; विद्यार्थी सज्‍ज

HSC Exam 2024 : बारावीच्‍या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी परीक्षेच्‍या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून दिला जाणार आहे.
HSC Exam
HSC Exam esakal

HSC Exam 2024 : इयत्ता बारावीच्‍या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी परीक्षेच्‍या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी अतिरिक्‍त वेळ मिळणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ सत्रातील लेखी परीक्षेला बुधवार (ता. २१) पासून सुरवात होत असून, इंग्रजी विषयाचा पहिला पेपर पार पडणार आहे. (nashik 12th exam starts from today marathi news)

नाशिक विभागातून १ लाख ६८ हजार ६३६ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. बारावीच्‍या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सज्‍ज झाले आहे. ऐनवेळी धावपळ होऊ नये म्‍हणून, अनेक विद्यार्थ्यांनी आपल्‍या पालकांसोबत मंगळवारी (ता. २०) परीक्षा केंद्राला भेट देत आसनव्‍यवस्‍थेची माहिती जाणून घेतली.

दुसरीकडे कनिष्ठ महाविद्यालयांकडून आसन व्‍यवस्‍था व वर्ग खोल्‍या यासंदर्भातील तपशिलांचे सूचना फलकावर लिखाण करण्याची लगबग दिवसभर सुरु राहिली. परीक्षेसंदर्भातील आवश्‍यक सूचनादेखील फलकांवर लिहिण्यात आल्‍या होत्‍या.

HSC Exam
SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर, बससेवा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान

अर्धातास आधी राहा केंद्रावर उपस्‍थित

परीक्षेच्‍या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धातास अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्‍थित राहण्याच्या सूचना दिल्‍या आहे. त्‍यानुसार सकाळ सत्रात सकाळी साडेदहाला तर दुपार सत्राच्‍या परीक्षेला दुपारी अडीचपर्यंत उपस्‍थित राहाणे आवश्‍यक असेल.

- विद्यार्थ्यांना मंगळवार (ता.२०) पर्यंत दिली आवेदनपत्रे भरण्याची मुदत

- परीक्षेदरम्‍यान महत्त्वाच्‍या बहुतांश विषयांच्‍या पेपरमध्ये ठेवलाय खंड

- केवळ अधिकृत संकेतस्‍थळावरील वेळापत्रक ग्राह्य धरण्याच्‍या सूचना

- आवश्‍यकतेनुसार केवळ कॅलक्‍युलेटर बाळगण्यास परवानगी, गॅझेट राहणार प्रतिबंधित

- अपरिहार्य कारणामुळे प्रात्‍यक्षिक, तोंडी परीक्षा देऊ न शकलेल्‍या विद्यार्थ्यांना मिळणार २० ते २२ मार्चदरम्‍यान संधी (latest marathi news)

HSC Exam
HSC Exam 2024 : बारावीची लेखी परीक्षा उद्यापासून! विभागातून 1 लाख 68 हजार 636 विद्यार्थी देणार परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com