
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेरा आखाड्यांच्या साधु-महंतांनी रविवारी (ता.१) नाशिक आणि त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा अमृत स्नानाच्या तारखा घोषित करण्यात आल्या. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सिंहस्थपर्वाला सुरवात होणार आहे. या पर्वाचा कालावधी तेरा महिन्यांचा असतो. पण, यंदाचा कालावधी २२ महिन्यांचा असणार आहे.