

voter list error
sakal
BJP Aspirants Wrongly Marked as Deceased in Nashik Voter List : नाशिकमध्ये प्रारूप मतदार यादी मधील घोळ काही थांबायचं नाव घेत नाहीये. नाशिक मध्ये चक्क भाजपच्या इच्छुक उमेदवारासच मृत दाखवण्यात आल्यानं मतदार यादी मधील गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय.
मतदार यादीमध्ये मृत म्हणून दाखवण्यात आलेले हे दोन्ही इच्छुक उमेदवार जेव्हा अचानक जिल्हाधिकाऱ्यांसमोर अवतरल्याने गोंधळ उडाला. निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर या मतदार याद्यांमध्ये अनेक नाव दुबार असल्याच समोर आलं होतं.
मात्र आता जी लोक जिवंत आहेत, त्यांनाच मृत घोषित करून त्यांची नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. धक्कादायक म्हणजे ही नावे वगळत असताना मृत्यू प्रमाणपत्रही जोडण्यात आले असून BLO ने देखील फॉर्म 7 वर त्यांना मृत म्हणून घोषित केलंय.
विशेष म्हणजे ही व्यथा विरोधी पक्षातल्या नेत्यांची नसून भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची आहे, ज्यांना आगामी नाशिक महापालिकेची निवडणूक लढवायची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.