esakal | महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी संदर्भातली आकडेवारी समोर, NCRB ची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी संदर्भातली आकडेवारी समोर, NCRB ची माहिती

राष्ट्रीय गुन्हा नोंद विभाग (एनसीआरबी) ने महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी संदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे. या देशातील भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी संदर्भातली आकडेवारी समोर, NCRB ची माहिती

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राष्ट्रीय गुन्हा नोंद विभाग (एनसीआरबी) ने महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी संदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे. या देशातील भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात १४.९ टक्के गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. तर भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाणाबाबत राज्य शेवटून दुसऱ्या क्रमाकांवर आहे.

एनसीआरबीनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 891 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रानंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमध्ये (424), तामिळनाडू (418), कर्नाटक (379), ओडिसा (353) गुन्ह्याची नोंद झाली आहे. सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या राज्यांमध्ये सिक्कीम (०), नागालॅंड (1),मिझोरम (2), मेघालय (2), मणिपूर (6), गोवा (9) राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र्रातील गुन्ह्यांची संख्या इतर राज्याच्या तुलनेत दुप्पट आहे. 

अधिक वाचाः  शिवसेना आक्रमक, सामनातून कंगनावर हल्लाबोल तर भाजपला सवाल

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) 2019च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल झालेत. देशातील 29 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये ही तुलना करण्यात आली आहे.

अधिक वाचाः  कोरोनामुळे आर्थिक ताण, तरीही रस्ते दुरुस्तीसाठी प्रयत्न योग्य; KDMCचा खुलासा
 

बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा राज्य सुरक्षित

याशिवाय गंभीर गुन्ह्यांचा विचार केला तर देशात हत्यांमध्ये राज्य तिस-या क्रमांकावर आहे. राज्यात 2019 मध्ये 2142 हत्येचे गुन्हे दाखल झाले होते. याबाबत उत्तर प्रदेश व बिहारमध्ये सर्वाधीक हत्या 2019 मध्ये गढल्या आहेत. उत्तरप्रदेश व बिहारमध्ये 2019 मध्ये अनुक्रमे 3806 आणि 3138 हत्यांचे गुन्हे दाखल झाले आहेत.

National Crime Records Bureau released Maharashtra crimes recorded data

loading image
go to top