''दादा तुम्ही सर्वात जास्त काम करता'', नवनीत राणांची अजित पवारांना साद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana on Ajit Pawar

''दादा तुम्ही सर्वात जास्त काम करता'', नवनीत राणांची अजित पवारांना साद

मुंबई : आम्हाला तुरुंगात वाईट वागणूक दिल्याचा आरोप राणा दाम्पत्यानं केला आहे. त्याची तक्रार दाखल करण्यासाठी आमदार खासदार पती-पत्नी दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नवनीत राणांनी (Navneet Rana) ठाकरे सरकारवर सडकून टीका केली तर अजित पवारांना (Ajit Pawar) साद घातली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं कौतुक केलं.

हेही वाचा: नवनीत राणा दिल्लीकडे रवाना, भाजपच्या नेत्यांसोबत फिल्डिंग?

अजित दादा तुम्ही महिलांचा सन्मान करता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत नाहीत. तुम्ही सर्वात जास्त काम करता. आमच्यावर लॉकअपपासून ते तुरुंगापर्यंत काय अन्याय झाला? याची माहिती घ्या. तुम्ही रोखठोक बोलणारे आहात. तुम्ही न्याय द्याल ही अपेक्षा आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या. ''हनुमान चालिसा आपल्या घरात किंवा मंदिरात वाचायची. दुसऱ्याच्या दारात कशाला जाता?'' अशी टीका अजित पवारांनी राणा दाम्पत्यावर केली होती. त्यालाही नवनीत राणांनी उत्तर दिलं असून अजित दादा तुम्ही सर्व माहिती घ्या आणि नंतर भाष्य करा, असं नवनीत राणा म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंवर टीका, फडणवीसांचं कौतुक -

अमरावती आणि मुंबईत ठाकरेंच्या गुंडांनी वातावरण बिघडवलं आणि तुरुंगात आम्हाला टाकलं. आम्हाला तुरुंगात अत्यंत वेदना दिल्या आहेत. माझ्यावर तुरुंगात अन्याय झाला आहे. मला अतिशय वाईट वागणूक दिली आहे. याबाबत मी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींपासून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार देणार आहे, असं नवनीत राणा यांनी सांगितलं. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. शिवसेनेने भाजपच्या पाठित खंजीर खुपसला असून त्यांनी आम्हाला सिद्धांताच्या गोष्टी शिकवू नये. बाळासाहेब खरे सिद्धांत पाळायचे. ते गेले आणि सिद्धांतही गेले. फडणवीसांना ५ वर्ष राज्य चालवलं. पण, असं सुडाचं राजकारण केलं नाही. त्यांच्याकडून काहीतरी शिका, असा सल्ला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

Web Title: Navneet Rana Demand Justice Ajit Pawar In Hanuman Chalisa Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ajit Pawarnavneet rana
go to top