esakal | जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...
sakal

बोलून बातमी शोधा

rana.jpg

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : अजून मी ऑर्डर वाचलेली नाही. ऑर्डर वाचल्यानंतर कळेल. आता न्यायालयाने निर्णय दिला आहे. मी त्याचा आदर करते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे (supreme court) दरवाजे खुले आहेत. मी सर्वोच्च न्यायलायत जाणार आहे. सर्वोच्च न्यायालय मला न्याय देईल, असे खासदार नवनीत राणा (mp navneet rana) म्हणाल्या. आज खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने रद्द (high court cancelled caste certificate of navneet rana) केले आहे. त्यानंतर त्यांनी पहिलीची प्रतिक्रिया दिली आहे. (navneet rana reaction on high court decision about cast certificate)

हेही वाचा: खासदार नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्यात वादाची ठिणगी कधी पडली?

गेल्या आठ वर्षांपासून आम्ही या प्रकरणासाठी भांडत होतो. मला जात प्रमाणपत्रासाठी जिल्हा न्यायालयापासून समस्या आल्या. त्यानंतर २०११ माझे लग्न झाले. २०१२ पासून विरोधक माझ्या मागे होते. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने परत कमिटीला सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांनी मला जात प्रमाणपत्र दिलं. त्यानंतर मी निवडणूक लढले. आम्ही कागदोपत्री भांडत होतो. मात्र, आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मी मान ठेवते, असे राणा म्हणाल्या. तसेच अचानक न्यायालयात हा निर्णय कसा काय होऊ शकतो. कुठेतरी राजकीय खिचडी शिजत आहे, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

नेमके काय आहे प्रकरण? -

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे २०१४ साली नवनीत राणा यांच्या विरोधात निवडून आले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यावेळी नवनीत राणा यांनी जात प्रामाणपत्र देऊ करून निवडणूक लढली होती. मात्र, याविरोधात २०१७ साली याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आता त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. हा संविधानिक घोटाळा असल्याचं न्यायालया म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय.

loading image
go to top