पोलिसांची माफी माग, नाहीतर...नवनीत राणांना पोलीस पत्नीचा इशारा

लव्ह जिहाद झाल्याचा आरोप करत राणा यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता.
Navneet Rana who created chaos in the police station should apologise demands of the police family
Navneet Rana who created chaos in the police station should apologise demands of the police family esakal
Updated on

सर्वांची माफी माग, नाहीतर तुला सोडणार नाही, असा इशारा पोलिसाच्या पत्नीने खासदार नवनीत राणा यांना दिला आहे. लव्ह जिहाद झाल्याचा आरोप करत राणा यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. (Navneet Rana who created chaos in the police station should apologise demands of the police family)

लव्ह जिहाद प्रकरणातून अशा मुलीचं अपहरण करून धर्मांतर केलं जातंय, असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नवनीत राणा यांनी पोलिसांना फोन केला असता काही मिनिटांनी हा कॉल रेकॉर्ड करण्यात आला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. पोलिसांनी लोकप्रतिनिधींचा फोन कोणत्या अधिकाराखाली रेकॉर्ड केला, असा सवाल करत नवनीत राणा आक्रमक भूमिका घेतली होती.

मात्र, त्यांची ही आक्रमक भूमिका पाहाता पोलिस कुटूंबाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.नवनीत राणा तुला शेवटची संधी देते. तुला खरेच माणुसकी असेल ना, तर सर्व पोलिसांची जाहीरपणे माफी माग. नाहीतर तुला आता मी सोडणार नाही. तू पोलिसांच्या काळजाला हात घातलेला आहेस. रात्रभर कोरोना काळामध्ये पोलिसांनी कर्तव्य पार पाडले. तुला पोलिसांचे दुःख नाही कळणार. पोलिसांबद्दल अपशब्द तू नेहमीच वापरतेस. आता मात्र त्यांची माफी मागावी लागेल, अन्यथा तुला सोडणार नाही, असा इशारा पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी दिला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अमरावतीतील एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याचा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. ही मुलगी काल संध्याकाळपासून गायब आहे. मुलीचा भाऊ खासदार राणा यांच्याकडे बुधवारी सकाळी मदत मागण्यासाठी आला.

बुधवारी सकाळी खासदार नवनीत राणा यांनी राजपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना फोन केला. सदर प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. यावेळी ठाकरेंनी हा फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com