Loksabha 2019 : नवनीत राणा अमरावतीतून लढणार?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मार्च 2019

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाघाडीत रवी राणा सहभागी होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष सहभागी होणार असल्याने त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा रवी राणा यांच्या पत्नी नवनीत यांना सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्या घड्याळावर की इतर कोणत्या चिन्हावर उभ्या राहणार, याची उत्सुकता आहे.

अमरावती : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत आज (रविवार) आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभीमानी पक्ष सहभागी झाला असून, रवी राणा यांची पत्नी नवनीत राणा कौर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाघाडीत रवी राणा सहभागी होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष सहभागी होणार असल्याने त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा रवी राणा यांच्या पत्नी नवनीत यांना सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्या घड्याळावर की इतर कोणत्या चिन्हावर उभ्या राहणार, याची उत्सुकता आहे.

हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाणार की राष्ट्रवादीकडे जाणार, याबाबत उत्सुकता होती. गेल्या वेळी याच मतदारसंघातून नवनीत यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार रवी राणा यांना भाजपला पाठिंबा दिला होता.

राणा पती-पत्नीने गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची अमरावती येथे भेट घेतली होती. तेव्हाच त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय़ होणार असल्याची चर्चा होती. रवी राणा यांनीही आपण आघाडीत जाणार असल्याचे सांगितले आहे.  नवनीत यांचा सामना आता शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navnit Rana Kaur to be contest Amravati Loksabha constituency