
ऐनवेळी समीकरणं बदलणार? मलिक आणि देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली. त्यांच्यासोबतच १०० कोटींच्या गैरव्यवहारात नाव आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील मतदानासाठी कोर्टाचे उंबरठे झिजवत आहेत. (MLC Election 2022)
राज्यसभेला मतदान करण्याची संधी गेल्यानंतर आता विधानपरिषदेला मतदान करता यावं, यासाठी दोघांनी याचिका दाखल केली होती. मात्र, सत्र न्यायालयापासून उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली. त्यामुळे दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत यावर सुनावणी पार पडणार आहे. (Nawab Malik seeks permission to SC court for mlc election 2022)
हेही वाचा: मतदान करायचे असेल, तर नवीन याचिका करा; मुंबई HC च्या मलिकांना सूचना
Web Title: Nawab Malik And Anil Deshmukh Filed Petition In Supreme Court Over Mlc Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..