मलिक-देशमुखांना भाजपच्या कार्यक्रमात सामील होण्यास सांगितलं होतं पण...; पवारांचा गौप्यस्फोट

nawab malik and anil deshmukh and Sharad Pawar
nawab malik and anil deshmukh and Sharad Pawar

मुंबई - मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण, शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अवतीभवती फिरत आहे. सातत्याने घडत असलेल्या घडामोडींमुळे राजकारण ढवळून निघालं आहे. आज पुन्हा एकदा शरद पवार यांनी पक्षात फूट नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

nawab malik and anil deshmukh and Sharad Pawar
Accident News : राष्ट्रीय महामार्गावर तवेरा गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

शरद पवार यांनी मुंबईत होऊ घातलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीबाबत माहिती दिली. या बैठकीला अनेक पक्षांचे अध्यक्ष सहभागी होणार आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले, भाजपने कर्नाटकात ईडीचा वापर करून पाहिला होता.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी ईडी आणि सीबीआयला धाडसाने तोंड दिल्याचं शरद पवार म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता पवार म्हणाले की, कारवाईच्या भीतीने काही भाजपसोबत गेले याबाबत मी कोणाचं नाव घेतलेलं नाही. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांना सांगण्यात आलं होतं की, तुम्ही भाजपच्या धोरणामध्ये, विचारांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा, अन्यथा तुमची जागा दुसरीकडे असेल. मात्र त्यांनी सक्त भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना काही महिने तुरुंगवास भोगावा लागला. या लोकांचा आम्हाला अभिमान असल्याचं पवार म्हणाले.

nawab malik and anil deshmukh and Sharad Pawar
भारतात बसून चांद्रयान चंद्रावर कसे उतरवायचे हे बटनांवर ठरवलं, मग..."; आव्हाडांनी बोलून दाखवली EVM बद्दलची शंका

पवार पुढं म्हणाले की, दुसरे आमचे सहकारी आहेत, ज्यांनी अनेक वर्षे आमच्यासोबत काम केलं, त्यांना चौकशांच्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी नसावी. त्यामुळे त्यांनी सत्ताधारी पक्षाला खुश कऱण्यासाठी त्यांनी सांगितलेला कार्यक्रम राबवला आणि आपली सुटका करून घेतली. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला असं वाटतं की, सत्तेचा गैरवापर करून अन्याय-अत्याचार करत असेल तर लोकशाहीमध्ये त्याच्याशी संघर्ष केला पाहिजे, आणि ती भूमिका आमच्या लोकांनी घेतल्याचं पवार म्हणाले.

हसन मुश्रीफ म्हणाले होते की, नोटीस आल्या तेव्हा आपल्याला सहानुभूती दाखवण्यात आली नाही. त्यावर पवार म्हणाले, नोटीस आल्यावर पक्ष हस्तक्षेप करू शकत नाही. अनिल देशमुख, संजय राऊत, नबाव मलिक तुरुंगात गेले. जे गेले नाहीत, ते भाष्य करतात. त्यांची सुटका कशी झाली? त्यांनी कोणाशी संवाद साधला ? मला माहित नसल्याचं शरद पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com