'कोरोना काळात गुजरात, उत्तर प्रदेशसारखी महाराष्ट्राची परिस्थिती नव्हती'

Nawab Malik
Nawab Malik esakal
Updated on

पुणे : कोरोना (corona) काळात महाराष्ट्राची परिस्थिती गुजरात (Gujrat), उत्तर प्रदेशसारखी (UP) झाली नाही. त्याठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन, बेड मिळत नव्हते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात तसे चित्र दिसले नाही. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) कोरोना परिस्थिती चांगली हाताळली, असा दावा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

Nawab Malik
‘ओमिक्रॉन’पासून मोठा धोका शक्य; WHO

''महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली. पण, जी परिस्थिती देशभरात पाहायला मिळाली तशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली नाही. देशभरात परिस्थिती वेगळ्या दिशेने जात होती. पण, महाराष्ट्र सरकारने सर्व उपाययोजना केल्या. ऑक्सिजन पुरवठा करण्याची जबाबदारी राज्य सरकारने यशस्वीपणे पार पाडली. औषधांचा तुटवडा झाला होता. त्याला देखील सरकारने हाताळले. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशात लोक रस्त्यावर मरत होते. त्यांना बेड मिळत नव्हते. त्यामुळे लोकांचा मृत्यू झाला. पण, महाराष्ट्रात असे चित्र दिसले नाही. गुजरातमध्ये मृत्यूंचा आकडा लपविण्यात आला. उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे गंगेमध्ये शव प्रवाहीत करण्यात आले. पण, महाराष्ट्राची परिस्थिती खूप चांगली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अतिशय चांगल्याप्रकारे परिस्थिती हाताळली'', असं मलिक म्हणाले.

२ वर्ष पूर्ण होऊनही गाजावाजा होत नाही, असे प्रश्न विचारले जातात. पण, आमच्या सरकारला गाजावाजा करण्याची गरज नाही, असा टोला देखील मलिक यांनी विरोधकांना लगावला. तसेच २ वर्षात महात्मा जोतिबा फुले कृषी सन्मान योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आमच्या सरकारने यशस्वीपणे पार पाडली, असंही मलिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

IPS solapur SP Atul Kulkarni
Solapur city police raid
solapur univercity
Government Plans AI Driven Safety Systems in Defence Industry Faster Licensing Better Security and Zero Accident Vision
Marathi News Esakal
www.esakal.com