'मोदी खोटारडे हे आज पुन्हा एकदा सिद्ध'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी किती खोटारडे आहेत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. नाशिकच्या सभेत मोदींनी शरद पवारांबाबत चूकीची माहिती जनतेला दिली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप नाशिकमध्ये झाला. या यात्रेच्या समारोपाला मोदी उपस्थित होते. काँग्रेसचे कन्फ्युजन मी समजू शकतो. मात्र, शरद पवारांसारखे अनुभवी नेते पाकिस्तानबद्दल असे बोलतात. शरद पवारांना शेजारचा देश चांगला वाटतो. तेथील राजकारणी त्यांना कल्याणकारी वाटतात, असे मोदींनी शरद पवारांबद्दल वक्तव्य केले होते.
 
याविषयी ट्विट करताना मलिक यांनी म्हटले आहे, की पवारांनी स्पष्ट सांगितले होते की पाकिस्तानातील राज्यकर्ते, सैन्य भारताविरुद्ध कुरघोडी करतात. मात्र मोदींनी साहेबांचे वाक्य फिरवून सांगितले. पंतप्रधान मोदी यांनाच पाकिस्तानचा जास्त पुळका आहे म्हणून २०१४ला नवाज शरीफांशिवाय त्यांना शपथ घेणे अवघड झाले होते. पुळका आहे म्हणूनच प्रोटोकॉल मोडत मोदी पाकिस्तानात बिर्याणी खायला गेले होते पवारांबाबत जो अपप्रचार मोदी करत आहेत तो सिद्ध करावा अन्यथा  वक्तव्याबाबत माफी मागावी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nawab malik Criticize on narendra modi