
नवाब मलिकांच्यावर ईडी कारवाई होताच मुनगंटीवार,भातखळकर म्हणाले...
गेल्या दिड महिन्याहून अधिक काळ नवाब मलिक (Nawab Malik) हे पोलिस कोठडीत आहेत. आज ईडीने मलिक यांच्या एकूण आठ मालमत्तांवर कारवाई केली. यानंतर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि अतुल भातखळकर (Atul Bhakhalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मालिक यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी मागणी यावेळी केली. अतुल भातखळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी आघाडीवर टीकास्त्र सोडले.
अतुल भातखळकर म्हणाले, नवाब मलिक यांना पाठीशी घालणारे शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नवाब मालिक यांना संरक्षण देत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आतातरी नवाब मालिक यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्यावे अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कायद्याच्या नियमानुसार चौकशी होईल याचा संबंध राजकारणाशी जोडला जाऊ नये. असा संबंध जर कोणी जोडत असेल तर या अमृत महोत्सवमध्ये विष पेरणारा नेता आहे. अन्याय झाला तर न्यायमूर्ती या यासंदर्भात निर्णय देतीलच. ईडी त्यांच काम करत आहे.प्रवीण दरेकर यांच्या संदर्भात खोट्या नाट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या मात्र कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असेही ते म्हणाले.
Web Title: Nawab Malik Ed Action After Bjp Leader Sudhir Mungantiwar And Atul Bhatkhalkar Reaction
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..