
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? माहिम दर्ग्याच्या विश्वस्ताची कसून चौकशी
मुंबई : दाऊदशी संबंध असल्याप्रकरणी आज मुंबई व उपनगरात तब्बल 29 ठिकाणी एनआयए कडून छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान प्रकरणात नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या छापेमारीत माहिम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवाणी यांची एनआयएने कसून चौकशी केली.
खंडवाणी यांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले नसून त्याना उद्या 12 वाजता NIA ऑफिसमध्ये बोलवण्यात आले आहे. आज सकाळी ६ वाजल्या पासून खंडवानीच्या घरी आणि कार्यालयात सर्च ऑपरेशन सुरू होतं सायंकाळी ७ वाजता सर्च ऑपरेशन थांबवून NIA अधिकारी खंडवानीच्या कार्यालयातून बाहेर पडले. तब्बल १३ तास खंडवानी यांची एनआयएने चौकशी केली.
नवाब मलीक यांचे दाऊदशी संबंध?
नवाब मलिक यांच्या संबंधाविषयी समोर आलेल्या माहितीनुसार, सोहेल खंडवाणी यांच्या खंडवाणी ग्रूप या कंन्स्ट्रक्शन व्यवसायात नवाब मलिक यांचा मुलगा पार्टनर आहे, अशी माहिती समोर आहे. दरम्यान या प्रकरणात त्यांचे बँक स्टेटमेंट तपासले जात आहेत. या दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार सोहेल खंडवाणी आणि नवाब मलीक याच्यात व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे डी कंपनीशी हे व्यवहार संबंधीत आहेत की, नाही याचा तपास पोलिस यंत्रणा करत आहेत, आता सध्या तरी हे व्यवहार व्यावसायिक असल्याचे समोर आले आहे.
Web Title: Nawab Malik May Get In Trouble As Nia Raid On Sohel Khandwanis House
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..