esakal | 'पटोलेंनी माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यावी, मग बोलावे'
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik

'पटोलेंनी माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यावी, मग बोलावे'

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

मुंबई: मागील अनेक दिवसांपासू्न काँग्रेसने आगामी निवडणुकीत वेगळी भूमिका मांडत आहेत. त्यात नाना पटोलेंनी मुख्यमंंत्री आणि उपमुख्यमंत्री नेत्यांवर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला होता. याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, नाना पटोलींनी पहिली सर्व माहिती जाणून घ्यावी. विनाकारण माहितीच्या अभावी आरोप करू नये. तसेच नाना पटोलेंनी त्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली पाहिजे असंही सांगितले.

सहकार खाते अमित शहांकडे सोपवल्यानंतर नवाब मलिकांनी टीका केली आहे. सहकार खाते राज्याच्या अधिन येते त्यामुळे यावर पूर्ण राज्याचा हक्क आहे, असंही मलिक यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात योगी सरकार 'टु चायल्ड पॉलिसी' आणणार आहे. ही पॉलिसी महाराष्ट्रातही आहे. राज्यात हा कायदा आहे. एकीकडे भाजपचे नेतेच दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घातली पाहिजे असे वक्तव्य करत आहेत तर दुसरीकडे योगी सरकार हा कायदा आणत असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

loading image