esakal | क्रुझवर काहीच मिळाले नाही, NCBची कारवाई खोटी, नवाब मलिकांचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

क्रुझवर काहीच मिळाले नाही, NCBची कारवाई खोटी, नवाब मलिकांचा दावा

क्रुझवर काहीच मिळाले नाही, NCBची कारवाई खोटी, नवाब मलिकांचा दावा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कॉर्टेलिया क्रुझवर एनसीबीनं जो छापा मारला त्याच्यावरुन महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी केलेल्या खुलाशामुळे वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहे.. त्यांच्या आरोपामुळे एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक खळबळजनक आरोप केले आहे. कारवाईतून एनसीबीच्या हाती काय आले, किती जणांना अटक झाली, याची खरी माहिती समोर यावी. त्या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांशिवाय इतरांचाही सहभाग होता. असे दिसुन आले आहे. त्याविषयी त्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी. खोटी कारवाई करुन जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप मलिक यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेमध्ये मलिक म्हणाले, एनसीबीनं जी कारवाई केली ती खोटी आहे असं म्हणावं लागेल. त्यांनी या कारवाईचे जे फोटो व्हायरल केले ते खरचं क्रुझवरचे होते याचे पुरावेही त्यांनी द्यावेत. याप्रकरणात मनीष भानुशाली कोण आहे याचीही माहिती मिळायला हवी. कारण त्या प्रकरणामध्ये तोच पुढे होता. त्यामुळे या प्रकरणात संबंधित व्यक्तींच्या जवळ असणारा मनीष भानुशाली कोण आहे याचाही उलगडा व्हायला हवा. यावेळी के पी गोस्वामी व्यक्तीच्या नावाचा उल्लेखही केला. अधिकारी अशा व्यक्तींच्या माध्यमातून खंडणी घेते का, असा सवालही मलिक यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

एनसीबीनं दावा केला की त्यांनी 26 अधिकाऱ्यांनी छापा टाकला. प्रत्यक्षात आठ ते दहा जणं त्यावेळी उपस्थित होते. अधिकारी काहीही माहिती देतात. नेमकी किती लोकं होती. यावेळी त्यांनी काही व्हिड़िओ शेयर केले. एनसीबीनं काही फोटो शेयर केले आहेत. त्यात सांगितलं त्यात चरस, कोकेन, केमिकल आणि गोळ्या आहेत. ते जप्त केले आहेत. कोणत्याही कारवाईमध्ये काय जप्त करायचे याचे काही नियम आहेत. मात्र त्याचे पालन झाले नाही. असा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.

loading image
go to top