
''पुरावा दिला तर बक्षीस देईन'', मलिकांनी शेअर केला क्रांतीच्या चॅटचा स्क्रीनशॉट
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Nawab Malik Vs Sameer Wankhede) यांचा नवीन फोटो समोर आणला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एक नवीन ट्विट करून 'अरे माझ्या देवा' अशी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर (kranti redkar) यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
मलिकांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये ''कोणीतरी एक व्यक्ती क्रांती रेडकर यांना मलिकांविरोधातील पुरावे असल्याचे सांगतात. क्रांती रेडकर कुठला पुरावा आहे, असं विचारतात. मलिकांचा दाऊदसोबत फोटो असल्याचं ती व्यक्ती सांगतेय. त्यानंतर मलिकांविरोधात पुरावा दिला तर मी बक्षीस देईल, असं क्रांती रेडकर रिप्लाय देतात.'' हे स्क्रीनशॉट शेअर करताना मलिकांना ओ माय गॉड, असं कॅप्शन दिलं असून आज सकाळीच मला हे मिळाल्याचं ते सांगतात.
दरम्यान, क्रांती रेडकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मी कोणासोबतही चॅट केली नसून मलिकांनी हे एडीट केलं आहे. मलिकांनी पडताळणी न करता पुन्हा एकदा अशी पोस्ट केली आहे. तसेच मुंबई सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचं क्रांतीने सांगितलं आहे.
सोमवारीच नवाब मलिकांनी मध्यरात्री बॉम्ब टाकत समीर वानखेडे यांचा निकाहाचा फोटो शेअर केला होता. यामध्ये ते मुस्लीम वेशात दिसून येताय. कबूल, कबूल, कबूल असं म्हणत त्यांनी हा फोटो ट्विट केला आहे. वानखेडे यांनी वारंवार आपला धर्म मुस्लीम नसल्याचा दावा केला आहे. त्यावर नवाब मलिक यांनी त्यांच्या शाळेचे दाखले देखील समोर आणले आहेत, ज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचं नाव समीर ज्ञानदेव वानखेडे धर्म हिंदू, तर काही ठिकाणी समीर दाऊद वानखेडे धर्म मुस्लीम असं दिसून येतं आहे. त्यानंतर आता हा फोटो समोर आला आहे.