esakal | नवाब मलिक, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा जुना जाणता नेता..
sakal

बोलून बातमी शोधा

नवाब मलिक, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा जुना जाणता नेता..

नवाब मलिक, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा जुना जाणता नेता..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडून आज मंत्र्यांना शपथ देण्यात आली. आज महाविकास आघाडीच्या पहिला मंत्रिमंडळ विस्तार झालाय. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते नवाब मलिक यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी याआधी अनेकदा मंत्री म्हणून काम पाहिलंय. आज नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली. नवाब मलिक हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. 

मोठी बातमी : 'राऊत' नाराज; शिवसेनेत नाराजी नाट्य शिगेला.. 

मोठी बातमी : नाराज राजू शेट्टींबद्दल नवाब मलिक म्हणतात..

नवाब मलिक हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जुने जाणते नेते आहेत. नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षाचं राष्ट्रीय प्रवक्ते पद आहे. याचसोबत नवाब मलिक मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देखील आहेत. नवाब मलिक या आधी देखील मंत्री राहिलेत. या आधी नवाब मलिक हे गृहनिर्माण मंत्री होते.    

मोठी बातमी :  आदित्य ठाकरे, महाविकास आघाडीच्या कॅबिनेटमधील सर्वात तरुण चेहरा !

मोठी बातमी : कामगार ट्रेड युनियन ते कॅबिनेट मंत्री, असा राहिला अनिल परब यांचा प्रवास

1996, 1999, 2004 मध्ये नेहरू नगर विधानसभा मतदार संघातून नवाब मलिक जिंकून आले होते. यानंतर 2009 मध्ये मुंबईतील अणुशक्ती नगरमधून नवाब मलिक जिंकले जिंकले होते. त्यानंतर 2014 ला नवाब मलिक पराभूत झाले होते. मात्र 2019 मध्ये पुन्हा नवाब मलिक अणुशक्ती नगर मधून निवडून आलेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले दुसऱ्या फळीतील नेते मानले जातात.

WebTitle : nawab malik took oath as cabinet minister of maharashtra