छापे मारणारे आले तर त्यांचे स्वागतच करु - नवाब मलिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik

छापे मारणारे आले तर त्यांचे स्वागतच करु - नवाब मलिक

राज्यात सध्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सुरू केलेल्या आरोपांच्या मालिकेवरून राजकारण तापलेलं आहे. त्यातच आज वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुण्यात आज सात ठिकाणी छापे टाकले आहेत. आज सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. मात्र पुण्यात नेमके कोणत्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यावर आता नवाब मलिका यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ईडीच्या या कारवाईबद्दल स्पष्टीकरण देताना त्यांनी वफ्फ बोर्डावर छापे पडले नसून, संबंधीत लोकांच्या घरावर छापे पडले आहेत असं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं आहे. तसेच एका ट्रस्टवर छापे पडल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यातील मुळशी तालुक्यातील ताबुत एंडोमन ट्रस्टवर छापे पडले असून, 2005 मध्ये चॅरिटी कमिनशनर ऑफिसमधून त्या ट्रस्टची निर्मीती झाली होती असंही त्यांनी सांगितलं.

मलिक यांनी यावेळी वफ्फ बोर्डाशी संबंधित काही गोष्टींचाही खुलासा केला आहे. वफ्फ बोर्डाशी संबंधित इतरही तीस हजार संस्था आहेत ईडीनं त्यांचाही तपास करावा. असे मलिक यांनी म्हटले आहे. आता लोकांच्या घरावर छापे पडत आहेत. पुण्याचा एक ट्रस्ट आहे. ताबुत एंडोमन ट्रस्ट, तालुका मुळशी, त्याठिकाणी 2005 मध्ये ते कार्यान्वित झाले होते. वक्त अॅक्ट लागू करण्यात आला होता. त्याचे रजिस्ट्रेशन तत्कालीन सरकारनं केलं होतं. आता छापेमारी होण्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली. त्यामुळे जे कोणी त्यासाठी आले असतील तर त्यांचे स्वागतच करु. अशी टीका मलिक यांनी विरोधकांवर केली आहे.

पुण्यातील एमआयडीसीनं 5 हेक्टरं लँड अॅक्वेझेशनचे पैसे जमा केले. आणि त्या संबंधित अधिकाऱ्यानं अन्य ट्रस्टी जे यात सहभागी होते त्यांना सात कोटीं 76 लाख 98 हजार 250 त्यांना अॅक्विझेशनचे पैसे देण्यात आले. मात्र कागदोपत्री 9 कोटी रुपये आहेत. जे बनावट कागदपत्रांच्या आधारे अफरातफर करण्यात आली ते गंभीर आहे. वफ्फ बोर्डाला जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर हे प्रकरण बाहेर आले. चांद रमजान मुलानी, इम्तियाज शेख, राजगुरु आणि कांबळे नावाच्या व्यक्तीचाही यात समावेश आहे. असेही मलिक यांनी यावेळी सांगितले.

loading image
go to top