नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार; आणखी तिघांना कंठस्नान? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

milind teltumbade

सी ६० कमांडोंनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. यामध्ये २६ नक्षलवादी ठार झाले.

नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार; आणखी तिघांना कंठस्नान?

गडचिरोली : महाराष्ट्र छत्तीसगढ सीमेवर असलेल्या कोटगुल ग्यारापत्ती जंगलात सी ६० कमांडोंनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. यामध्ये २६ नक्षलवादी ठार झाले. जवळपास चार तासांहून अधिक काळ झालेल्या या चकमकीत नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडेसुद्धा ठार झाला आहे. मिलिंद तेलतुंबडे याच्यासह जहाल नक्षली जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

सुरजागड लोह प्रकल्पाच्या संदर्भात जन आंदोलन उभे करण्यासाठी नक्षली नेत्यांची बैठक आयोजित होती. त्यात हे सगळे मोठे केडर उपस्थित होते, अशी माहिती मिळतेय. या चकमकीत 26 नक्षली ठार ठार झाले असून, यात या चार नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. पैकी मिलिंद तेलतुंबडे याची खात्री पटली आहे. उर्वरित तीन नावांना पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

हेही वाचा: नक्षलवादाला शहरी चेहरा देण्याचा मिलिंद तेलतुंबडेचा प्रयत्न

पोलिस नक्षलवादी चकमकीत देशातला मोठा नक्षल कमांडर आणि 50 लाखांचे बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे हा नक्षलवादाबद्दल सहानुभुती बाळगणा-यांना संघटीत करण्याचे काम करण्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होता अशी माहिती पहाडसिंग याच्या जबाबातून समोर आली होती. वरिष्ठ माओवादी नेता पहाडसिंग याचा एल्गार आणि भीमा - कोरेगाव प्रकरणात पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी जबाब नोंदवला आहे. तसेच दलित संघटनांना चळवळीत सहभागी होण्याकरिता प्रेरित करतो, असे त्याने सांगितले होते. त्याची काम करण्याची पद्धतीने पहाडसिंगने न्यायालयात सांगितले होते.

loading image
go to top