

ठाणे : ‘‘काही स्वयंसेवी संस्था सातत्याने सरकारच्या विरोधात खोटे पसरविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आता केवळ गडचिरोलीपर्यंत मर्यादित असलेला नक्षलवाद या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून थेट शहरी भागातही पसरला आहे,’’ असे धक्कादायक प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज केले.
कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार ॲड. निरंजन वसंत डावखरे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा रविवारी सायंकाळी पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.
‘‘महायुतीच्या सरकारने राज्यात खूप कामे केली. बंद पडलेले अनेक प्रकल्प, योजना सुरू केल्या. सण उत्सवांवरील निर्बंध हटविले, सण-उत्सवांचे संस्कृती जपली. एवढी कामे केली असतानाही नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपल्याविषयी खोटा प्रचार करण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. आता तसे होऊ देऊ नका,’’ असे शिंदे म्हणाले.
शिंदे म्हणाले, ‘‘४०० पारच्या घोषणेने आपले मतदार काहीसे निवांत झाले, मतदानाच्या दिवशी बाहेर फिरायला गेले, त्याचाही फटका आपल्याला बसला. पण आता असे करू नका.’’ मुंबईबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘मुंबई आपलीच आहे असे म्हणणाऱ्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. राज्यात त्यांच्या 30 जागा निवडून आल्या, आता विधानसभेला 180 जिंकणार अशा बढाया महाविकास आघाडी मारत आहे. आपला ‘स्ट्राईक रेट’ यापेक्षा जास्त आहे. राज्यात काही ‘पॉईंट’ने मागे असलो तरी, मुंबईत आपण सरस आहोत.’’
जिथे जिंकले तिथे ईव्हीएम चांगले, अशी विरोधकांची भूमिका आहे. रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या जिव्हारी लागला. असे सांगून शिंदे म्हणाले, ‘‘ते आता लोकसभा अध्यक्ष निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देणार असे सांगत आहेत. त्यांची अवस्था ‘अंजाने शादी में अब्दुल्ला दिवाना,’ अशी झाली आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.