esakal | "...म्हणून त्यांना सोडलं"; NCBचं नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

NCB

"...म्हणून त्यांना सोडलं"; NCBचं नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर

sakal_logo
By
सुधीर काकडे

राज्यातील महाविकास आघाडी सरकाचे मंत्री नवाब मलिक यांनी २ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रुझवर केलेल्या कारवाईवर काही प्रश्न उपस्थित केले होते. एनसीबीच्या या कारवाईत भाजपचे लोक सहभागी होते, तसेच ही कारवाई महाविकास आघाडी सरकार आणि बॉलिवुडला बदनाम करण्यासाठी केली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या सर्व आरोपांवर आज एनसीबीनं उत्तर दिलं आहे. आम्ही केलेल्या कारवाईत सर्व बाबी कायदेशीर रित्या केली असल्याचं आज एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: Live: खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं - उद्धव ठाकरे

काही लोकांना सोडून देण्यात आलं?

क्रुझवर झालेल्या कारवाईत सर्व गोष्टी कायदेशीररित्या करण्यात आल्याचं यावेळी एनसीबीकडून सांगण्यात आलं. दोन ऑक्टोबरला एकूण १४ लोकांना अटक करण्यात आली होती, त्यातील ८ लोकांवर कायदेशीर अटकेची प्रक्रिया झाली कर इतर ६ लोकांना पुराव्यांअभावि सोडून देण्यात आल्याचं एनसीबीकडून सोडून देण्यात आलं.

कारवाईत भाजपशी संबंधीत लोक होते का?

NCB एक निष्पक्ष ऑर्गनायझेशन असून, देशाला नशामुक्त करण्यासाठी आम्ही काम करतो. लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही कारवाई करत असतो. २ तारखेला केलेल्या कारवाईत ८ लोकांना कोकेन चरस आणि १ लाखांवर रक्कमेसोबत पकडलं होतं. कायदेशीर कारवाईसाठी स्वतंत्र साक्षीदार देखील ठेवावे लागत असतात. तसे या प्रकरणात ९ साक्षीदार होते. त्यामध्येच मनिष भानुशाली, गोसावी होते. एनसीबी यांना आधी ओळखत नव्हती असंही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आलं.

एनसीबीच्या कारवाईत कुठलाही राजकीय संबंध नसून, आता पर्यंत केलेली सर्व कारवाई कायदेशीर होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना योग्य वागणूक दिली जात असून, आरोपींच्या वकिलांनी देखील आम्हाला सहकार्य केलं असल्याचं यावेळी एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप एनसीबीने फेटाळून लावल्याचे पाहायला मिळाले आहे.

loading image
go to top