

NCERT Drops 1759 Maratha Empire Map; Bhonsle Dynasty Alleges Political Pressure
esakal
नागपूरकर भोसले राजघराण्याचे सध्याचे वंशज मुधोजीराजे भोसले यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेवर (एनसीईआरटी) गंभीर आरोप केला आहे. आठवी इयत्तेच्या इतिहास पुस्तकातून १७५९ च्या मराठा साम्राज्याच्या विस्ताराचे दर्शन घडवणारा महत्त्वाचा नकाशा एकतर्फीपणे काढून टाकण्यात आला असून, यामागे राजस्थानमधील राजपूत घराण्यांचा दबाव कार्यरत असल्याचा त्यांचा दावा आहे. या नकाशाला पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी तीव्रपणे केली आहे.