Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

NCP Ajit Pawar Dharashiv Candidate: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय.

धाराशिवमधून लोकसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्चना पाटील यांनी सभा घेतली होती. याप्रकरणी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे या सभेला अजित पवार हे स्वत: उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीकडून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते.

Ajit Pawar
AJit Pawar vs Anjali Damania: नार्को टेस्टवरून जुंपली, दमानियांनी स्वीकारलं अजित पवारांचे चॅलेंज...

निवडणूक आयोगाने याप्रकरणी ४३ दिवसानंतर दखल घेतली असून आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे निकालाआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar: खडकवासल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडण्यात यावे, आमदारांनी केली पवारांकडे मागणी

धाराशिव लोकसभा मतदारसंघ चर्चत राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उशिरा अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. अर्चना पाटील यांचा जनसंपर्क फारसा चांगला नसल्याने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना याठिकाणी जोर लावावा लागला. अजित पवारांची देखील याठिकाणी सभा झाली. शिवाय, भाजप आणि शिंदे गटाची ताकद याठिकाणी राष्ट्रवादीला मिळू शकली. त्यामुळे अर्चना पाटील हवा निर्माण करण्यात यशस्वी झाल्या.

दुसरीकडे ठाकरे गटाचे धाराशिवचे लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिवाय ठाकरे गटाला एकनिष्ठ राहणाऱ्या मोजक्या खासदारांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांना सहानुभूतीचा फायदा होण्याची शक्यता आहे. शिवाय निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी संपूर्ण धाराशिव मतदारसंघ पिंजून काढला होता. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघ निर्याणक ठरेल असं राजकीय तज्ज्ञांकडून बोललं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com