
Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या सुटकेनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आता…
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची एक वर्ष १ महिना आणि २७ दिवसांनंतर तुरूंगातून सुटका झाली. यादम्यान आज आर्थर रोड जेलबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. यादरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आम्हा सगळ्यांना आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया दिली.
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यादरम्यान अजित पवार म्हणाले की, आज आम्ही खूप आनंदी असून सगळ्यांनी अनिल देशमुख यांचं स्वागत केलं.
यावेळी अनिल देशमुखांना न्याय मिळाण्यासाठी खूप उशीर झाला असं वाटतं का या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, न्यायव्यवस्थेपुढे आपण काय बोलू शकतो, न्याय व्यवस्थेने घेतलेल्या निर्णय आपल्याला पाळावे लागतात. तसेच आम्ही वकिलांमार्फत कोर्टात जाणार असून अनिल देशमुख यांनी देशात कुठेही फिरता यावं यासाठी परवानगी मागणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली.
आता कोर्टाने अनिल देशमुख यांच्या संदर्भात काय निर्णय दिला आहे ते सगळे पाहतील, हे कशा पध्दतीनं घडलं हे सत्य जनतेसमोर येईल असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा: Rahul Gandhi On Marriage : लग्नासाठी कशी मुलगी हवीय? राहुल गांधींनी पहिल्यांदाच दिलं उत्तर
गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून अनिल देशमुख यांनी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते, १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये जून महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला होता.
हेही वाचा: Rahul Gandhi Tweet : PM मोदींसाठी राहुल गांधीचं भावनिक ट्वीट; म्हणाले, या खडतर प्रसंगी…