Ajit Pawar: 'आम्हाला अजित पवारांची गरज, टीका करू नका'; भाजप नेत्यांची संघाला विनवणी!

BJP leaders request to RSS For Ajit Pawar: भाजपचे अनेक नेते आणि संघाशी संबंधित साप्ताहिकांमध्ये अजित पवारांवर टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून संघाला एक विनंती केल्याचं समजत आहे.
devendra fadnavis mohan bhagwat ajit pawar
devendra fadnavis mohan bhagwat ajit pawar
Updated on

मुंबई- अजित पवार यांना पक्षामध्ये घेतल्यामुळे भाजपला तोटा झाला अशा प्रकारची चर्चा भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या गोटामध्ये सुरु आहे. त्यामुळे भाजपचे अनेक नेते आणि संघाशी संबंधित साप्ताहिकांमध्ये अजित पवारांवर टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून संघाला एक विनंती केल्याचं समजत आहे.

अजित पवारांवर टीका करणे टाळा अशी विनवणी भाजपकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. अजित पवारांवर टीका करणे टाळा अशा प्रकारची विनवणी भाजपच्या नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे. अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज आहे. विधानसभेला सहकार्य ठेवा अशी विनंती भाजपने संघ पदाधिकाऱ्यांकडे केली आहे.

devendra fadnavis mohan bhagwat ajit pawar
Ajit Pawar : निधीसाठी जमीन विकायची का?अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी

मंगळवारी भाजपच्या नेत्यांची संघासोबत आढावा बैठक झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली होती. यावेळी अजित पवारांविषयी चर्चा झाली. अजित पवार सध्या महायुतीचे घटक आहेत. विधानसभेला त्यांची आपल्याला मदत होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे टाळले पाहिजे असा सूर भाजप नेत्यांचा बैठकीत होता.

अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला अशी चर्चा भाजप आणि संघाच्या कार्यकर्ते, नेत्यांमध्ये सुरु आहे. संघाशी जवळीक सांगणाऱ्या साप्ताहिकामध्ये तर थेट अजित पवारांना अपयशाचं कारण ठरवण्यात आलं होतं. मात्र, भाजप नेत्यांनी संघाच्या नेत्यांना सबुरीनं घेण्याचं सांगितल्याचं कळतंय.

devendra fadnavis mohan bhagwat ajit pawar
Ajit Pawar: "आता काय जमिनी विकून निधी देऊ का?"; कॅबिनेट बैठकीत अजित पवार मंत्र्यांवर का संतापले?

भाजपच्या पुण्यातील दोन दिवसाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पक्षात का घेतलं याबाबत कारण सांगितलं होतं. निवडणुकीमध्ये तह करावे लागतात. शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्य स्थापनेवेळी तह, माघार घेतली होती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. अजित पवार आता आपल्यासोबत आहेत. त्यांना सोबत घेऊनच विधानसभेला सामोरे जायचं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com