Ajit Pawar: काहींनी भाषणे खूपच लांबवले...; मेळाव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

Ajit Pawar: काहींनी भाषणे खूपच लांबवले...; मेळाव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

बारामती : "काल मी दोघांचेही भाषणे ऐकले. सर्व महाराष्ट्राने हे मेळावे पाहिले. दोघांनीही एकमेकांवर टीका केली, मी दोघांच्याही भाषणावर टीका करणार नाही पण लोकांनी कुणाच्या पाठीमागे उभे राहायचे हे त्यांनी ठरवायचे" असं मत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. बारामती दौऱ्यादरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.

(Ajit Pawar On Shivsena Dasara Melava)

"कालच्या मेळाव्यात काहींना जेवायला मिळाले नाही, कुणाला नाष्टा, चहा मिळाला नाही. काहींना तर आपण कशाला आलोय हेच माहिती नाही. त्यांच्या भाषणाबद्दल आपल्यालाही माहिती आहे. तर आता कुणाला पाठिंबा द्यायचा हे जनतेने ठरवावे. कुणाच्या पाठीशी उभे रहावे हे ज्याचे त्याने ठरवावे, कारण झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा असं मी कधी ऐकलं नाही. तर काल केलेली वक्तव्य हे राजकीय असल्यामुळे त्याला जास्त महत्त्व द्यायचं नसतं" असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा: Crime: मुंबईत 80 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; महसूल विभागाची कारवाई

वेदांताबाबत महाविकास आघाडी साकारात्म होती पण तुम्ही आता आरोप करता आहात तर आम्ही टक्केवारी घेतली हे सिद्ध करून दाखवा. सभागृहातही हा प्रकल्प येतोय असं त्यांनी बोलून दाखवलं होतं पण आता आमच्यावर खोटे आरोप करायचे, याला काही अर्थ नाही.

शिवसेनेची स्थापना झाल्यापासून दसरा मेळाव्याच बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोकं यायचे. पण कालच्या दसरा मेळाव्यात काहींची भाषणे खूपच लांबली, आता कुणाची लांबली ते तुम्हालाही माहिती आहे अशी मिश्किल टीकाही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.