esakal | भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला; म्हणाले "धरणात..."
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

भाजप आमदाराचा अजित पवारांना सणसणीत टोला; म्हणाले "धरणात..."

sakal_logo
By
विराज भागवत

अजित पवार यांनी नारायण राणेंवर केला होता हल्लाबोल

मुंबई: नारायण राणे आणि उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाची व्यक्तिमत्व. उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले तर राणे यांना केंद्रात भाजपकडून मंत्रीपद मिळाले. त्यामुळे गेले काही भाजप विरूद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचे चित्र आहे. नुकतेच कोकणमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण आले. त्यावेळी राज्यातील अधिकारी वर्ग तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. या मुद्द्यावरून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत राजशिष्टाचाराचा मुद्दा मांडला. पण त्याच विषयावरून अजित पवार यांच्यावर भाजप आमदाराने टीकास्त्र सोडलं आहे. (NCP Ajit Pawar slammed by BJP Atul Bhatkhalkar over Narayan Rane Uddhav Thackeray spat)

हेही वाचा: लोकलसाठी प्रवाशीच करणार विनातिकिट आंदोलन, वकिल लढवणार मोफत खटला

Narayan-Rane

Narayan-Rane

'सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत अधिकारी सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. मग इथे कोण आहे?', असं राणे म्हणाले होते. त्यावर, 'काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्याबाबत अरे-तुरे शब्द वापरले. पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही', असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंचे नाव न घेता त्यांना सुनावलं होतं. त्याच विषयीचे एक कात्रण भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले आणि अजित पवार यांना त्यांच्या एका जुन्या विधानाचा दाखला देत टोला लगावला.

हेही वाचा: 'आता लोकल सुरु करा अन्यथा...'मनसेचा आंदोलनाचा इशारा

अजित पवार यांनी राणे यांना टोमणा लगावताना म्हटले होते, "मुख्यमंत्र्यांबद्दल अरे तुरेची भाषा वापरणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी त्या-त्या ठिकाणी जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु प्रत्येक जण तिथे गेल्यानंतर म्हणजे तिथे VIP असतील आणि त्यांचं असं म्हणणं असेल की, आमच्यासोबत कलेक्टर असले पाहिजे, प्रांत असले पाहिजे तर अशी अपेक्षा तिथे कुणी करु नये." याच प्रकारानंतर भाजप आमदाराने अजित पवारांवर टीका केली.

loading image
go to top