मी शिवसैनिक नाही मात्र...; मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' सोडल्यानंतर मिटकरींचे ट्वीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Mitkari

मी शिवसैनिक नाही मात्र...; मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' सोडल्यानंतर मिटकरींचे ट्वीट

मुंबई : एकनाथ शिंदेच्या बंडानंकर शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत, दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मला सत्तेचा मोह नाही असे स्पष्ट केलं होतं. तसेच त्यांनी वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेत अमोल मिटकरी यांनी मी शिवसैनिक नाही मात्र हा भावनिक क्षण पाहून मन गहिवरून आलय... असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगला सोडणार असल्याने मिटकरी यांनी ट्वीट करत हा क्षण भावनिक असल्याचे म्हटले आहे, ते म्हणाले आहेत की, "मी शिवसैनिक नाही मात्र हा भावनिक क्षण पाहून मन गहिवरून आलय....", त्यांनी माजी मुख्यमंत्री भाडप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील बोचरी टीका केली आहे, ते म्हणाले की, "सत्ता पिपासु मुख्यमंत्री मागच्या सरकार मधे बघितला मात्र सामान्य कार्यकर्त्यांसाठी वर्षा बंगला सोडणारा कुटुंब प्रमुख पहिल्यांदाच....". दरम्यान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्र्याचे निवास्थान वर्षा सोडून मतोश्रीवर जाणे याला अनेक राजकीय अर्थ देखील आहेत.

हेही वाचा: एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रि‍पदाला कॉंग्रेसचा पाठिंबा - नाना पटोले

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर घडणाऱ्या राजकीय घडमोडींमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय निवास्थान सोडलं आहे. काही वेळापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधतांना ठाकरेंनी आपण वर्षा बंगल्यातून आज बाहेर पडणार असून, येथून मातोश्री येथे जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता अखेर उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यातून सामानासह बाहेर पडले आहेत.

Web Title: Ncp Amol Mitkari Tweet Amides Cm Uddhav Thackeray Leave Varshsa Bungalow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top