Pune Lok Sabha by-election : पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरू; पुण्याच्या दोन्ही जागेवर काँग्रेसचा दावा

‘राष्ट्रवादी’च्या खेळीकडे काँग्रेसने बारीक लक्ष ठेवून त्यांचा डाव उधळण्याचा पवित्रा कायम
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal

मुंबई : भाजप आणि शिवसेनेला (शिंदे गट) हरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिघांनी वज्रमूठ बांधलेली असतानाही पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या जागेवर डोळा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने उघडपणेच दावा ठोकून ती जागा मिळविण्याची व्यूहनीती आखल्याचे दिसत आहे.‘राष्ट्रवादी’च्या खेळीकडे काँग्रेसने बारीक लक्ष ठेवून त्यांचा डाव उधळण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.

परिणामी पुण्याच्या जागेवरून आघाडीतील दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आतापर्यंत पुणे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. या मतदारसंघात त्यांचे उमेदवार अनेकदा निवडूनही आले आहे.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election : दोन हजारांच्या नोटांचा लोकसभा निवडणूकीशी संबंध; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

२०१४ पासून राष्ट्रवादी काँग्रेस विस्तार करू पाहत आहे. त्यातूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’च्या काही नेत्यांनी पुण्यातील जागेवर हक्क सांगितला होता. पक्षाचे नेते अजित पवार यांनी २०१९ च्या आधीच पुण्याच्या जागेबाबत सूचक विधान केले होते.

भाजपला रोखण्यासाठी आता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची आघाडी उभी राहिली आहे. लोकसभेच्या२०२४ च्या निवडणुकीच्या जागावाटपाचा निमित्ताने झालेल्या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरल्याचे जाहीर झाले आहे. तरीही पुण्याच्या जागेवर अजित पवार यांनी पुन्हा एकदा दावा केल्याने राजकीय वर्तुळात विशेषतः काँग्रेसच्या गोटात गोंधळ उडाला आहे.

Lok Sabha Election 2024
Prakash Ambedkar यांनी Congress, NCP च्या बदलत्या भूमिकेवरून Uddhav Thackeray यांना दिला इशारा

ताकद वाढल्याचा काँग्रेसचा दावा

भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. त्याचवेळी भाजप आणि विरोधकांच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष पुण्याकडे लागले असताना या जगेवरून आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये नवा वाद उद्‍भवण्याचे चित्र आहे. दुसरीकडे भाजपचे आव्हान असताना गेल्या अडीच तीन वर्षांत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढल्याचा दावा करत काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असतानाही पंढरपूर विधानसभा निवडणुकीत या पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे सांगून एखादी जागा मिळवणे योग्य नाही, असे बोल काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ऐकवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com